*कोंकण एक्सप्रेस*
*मोर्ले येथे वार्षिक पारंपारिक धालोत्सवास प्रारंभ*
*दोडामार्ग : शुभम गवस*
मोर्ले येथील श्री कुळघर येथे मंगळवारी धालोत्सवाचा प्रारंभ झाला असून शनिवारी याची सांगता होणार आहे.पाच रात्री जागून गावातील महिला हा उत्सव साजरा करतात.धालोत्सवाबाबत अशी प्रथा आहे की, वनदेवतेला प्रसन्न करण्यासाठी हा पारंपारिक उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे प्रामुख्याने या उत्सवात गायल्या जाणा-या ओव्या निसर्गावर व देवतांवर आधारित असतात.या धालोत्सवात विशेषतः महिला उत्साहाने सहभागी होतात.गावातील महिला एकत्र येऊन हा उत्सव आनंद व उत्साहाने साजरा करतात.