*कोकण Express*
*गॅस सिलेंडरच्या दरात आणखी २५ रुपयांची वाढ, नवे दर ८१९ रुपये*
पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा सिलसिला सुरूच असून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. ताज्या दरवाढीनंतर विनाअनुदानित गॅस सिलेंडरचे दर ८१९ रुपयांवर गेले आहेत. गेल्या महिन्याच्या काळात गॅस सिलेंडरचे दर तब्बल चारवेळा वाढले आहेत. सिलेंडरच्या वाढत्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.