*कोंकण एक्सप्रेस*
*चाफेड दुर्गाचा महादरवाजा घेणार मोकळा श्वास !*
*मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य रजि. कणकवली विभागाची मोहीम*
*देवगड : प्रतिनिधी*
चाफेड दुर्ग येथे मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य रजि.कणकवली विभागाची चाफेड दुर्ग महादरवाजा मोकळा करण्याची मोहीम तिसऱ्यांदा पार पडली.किल्ल्याचा कोसळलेला महादरवाजा मोकळा करणे हेच ध्येय कणकवली विभागाचे आहे आणि २०२५ या वर्ष मधे घेऊन २५ मोहिमांचे नियोजन या किल्ल्यासाठी आणि महादरवाजा मोकळा करण्यासाठी मावळे आम्ही स्वराज्याचे कणकवली विभागाने केलेलं आहे.
या संस्थेचे संस्थापक श्री.सुमित कूशे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपजिल्हा अध्यक्ष अनिकेत तर्फे यांच्या संकल्पनेतून या पुढील २५ मोहीमा चाफेड दुर्गावरती होतील त्याच्या तारखा आणि वेळ लवकरच सर्वांना कळवण्यात येतील.
आजच्या मोहीम मधे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अनंत आचरेकर ,उपजिल्हा अध्यक्ष श्री. अनिकेत अनंत तर्फे, कणकवली तालुका प्रमुख, प्रतीक भाट, खजिनदार नील आचरेकर, सल्लागार प्रियंका नरे तसेच सभासद – मयूर रांबाडे शांताराम सादाये प्रकाश तेली, रोहन रांबाडे, उमेश रांबाडे,रक्षिता सावंत, रसिका, मयूर मांडवकर, इकबाल शेख, उपस्थित होते.