तिलारी धरण प्रकल्पाची उजव्या कालव्याची पाणीपुरवठा पाईपलाईन कोसळली

तिलारी धरण प्रकल्पाची उजव्या कालव्याची पाणीपुरवठा पाईपलाईन कोसळली

*कोंकण एक्सप्रेस*

*तिलारी धरण प्रकल्पाची उजव्या कालव्याची पाणीपुरवठा पाईपलाईन कोसळली*

*दोडामार्ग  : शुभम गवस*

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण प्रकल्पाची उजव्या कालव्याची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन घोटगेवाडी येथे कोसळली,हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला.
पाईपलाईन कोसळल्यामुळे घोटगेवाडी,घोटगे परमे या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे, गेल्या वर्षी या पाईपलाईनची डागडुजी करण्यात आली होती.

मात्र ही डाकडुजी कूच कामी ठरली, अखेर ही पाईपलाईन कोसळली.एन शेतीच्या हंगामात ही पाईपलाईन कोसळल्यामुळे याचा फटका घोटगेवाडी, घोटगे, परमे येथील शेतकऱ्यांना बसला आहे. पाईप लाईन कोसळल्या मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!