*कोकण Express*
*जानवली सरपंच आर्या राणे यांचा राजीनामा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील जानवली ग्रामपंचायतीच्या सरपंच आर्या अमोल राणे या आपल्या पदाचा राजीनामा सभापती यांना उद्या (ता. 1) सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जानवली ग्रामपंचायत व ग्रामस्थाच्या वतीने सरपंच आर्या राणे यांचा उद्या सत्कार केला जाणार आहे. जानवली ग्रामपंचायतीच्या सभागृहात उद्यासकाळी 10 वाजता हा सत्काराचा कार्यक्रमा होणार आहे.
जानवली सरपंच पदी थेट निवडणुकीने सौ. राणे या निवडून आल्या होत्या. मात्र, पुढील पाच वर्षासाठी इतर मागास प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षण झाले आहे. त्यामुळे विद्यमान सदस्यांमधील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळावी. या हेतूने सौ. राणे या पदाचा राजीनामा देत आहेत. याबाबत आपल्या पदाचा राजीनामा सभापतींना उद्या सादर करणार आहेत. त्यामुळे जानवली ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे. गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ माजी पोलीस पाटील पांडुरंग रावजी राणे यांनी या सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

—-
