*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गातील रिक्षाचालकांच्या गुणवंत मुलांचा सत्कार*
*२५ जानेवारीला गोपुरी येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशन,मानव अधिकार संरक्षण संघटना,कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षाचालक- मालकांची मुले जी इंजिनिअर,नेव्ही,सैनिक,डॉक्टर,वकील,सीए किंवा उच्चपदावर कार्यरत आहेत,त्यांचा सत्कार २५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ .०० वाजता कणकवली येथील गोपुरी आश्रम,पर्यटन निवास केंद्र वागदे करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयकुमार काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पराग मातोंडकर,जेम्स महाराष्ट्र झोनचे अधीक्षक रेव्ह. संजय पन्हाळकर,कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा ह्युमन राईट असोसिएशनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक,वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी विलास बगडे आदी उपस्थित राहणार आहेत.
जिल्हयातील जे रिक्षाचालक-मालक तीस वर्षाहून अधिक काळ प्रवाशांना सेवा देत आहेत,त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.रिक्षा चालक- मालकांनी आपली नावे व आपली पाल्ये उच्च शिक्षित व ज्या पदावर आहेत,त्याची माहिती व किती वर्षे रिक्षा व्यवसाय करतात याची माहिती आपल्या तालुक्यातील रिक्षा संघटनेचे तालुकाध्यक्ष किंवा रिक्षा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुधीर पराडकर ( ९४२३८१९३१६) किंवा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभाग अध्यक्ष तथा कोकण विभाग टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांच्याकडे नोंदवावीत,असे आवाहन सावंतवाडी तालुका रिक्षा संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सावंत व सुधीर पराडकर यांनी केले आहे.

