साटेली भेडशी थोरले भरड कालव्यात परप्रांतीयचा मृतदेह

साटेली भेडशी थोरले भरड कालव्यात परप्रांतीयचा मृतदेह

*कोंकण एक्सप्रेस*

*साटेली भेडशी थोरले भरड कालव्यात परप्रांतीयचा मृतदेह*

*दोडामार्ग :प्रतिनिधी*

साटेली भेडशी थोरले भरड कालव्यात एका परप्रांतीय मृतदेह सापडल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.संजू नागाप्पा मुकुलकट्टी (३८,रा.मुळगाव हिरे होणारी,धारवाड,कर्नाटक) असे त्याचे नाव आहे.सहा महिन्यांपूर्वी तो त्याच्या साथीदार इसम मंजुनाथ होडागी याचांसह गवंडी काम करण्यासाठी आला होता.

दोघेही सहा महिन्यांपूर्वी खानयाळे येथे कामानिमित्त आले होते. ते तेथील एका फार्म हाऊसवर गवंडी काम करीत होते. अन्य साथीदारांसोबत एका खोलीत राहत होते. सोमवारी सायंकाळी दोघेही जेवणाच्या निमित्ताने साटेली भेडशी बाजारपेठेत गेले होते. मात्र, उशिरापर्यंत ते रूमवर न परतल्याने त्यांच्या अन्य साथीदारांनी शोध घेतला. परंतु, ते कोठेच सापडले नाहीत. मंगळवारी दुपारी शोध घेत असता साटेली भेडशी थोरले भरड येथे कालव्यातील गेटजवळ बांबूला मृतदेह अडकून पाण्यावर तरंगत असल्याचे दृष्टीस पडल त्यांनी ही माहिती आपल्या मुकादमाला दिली. मुकादमाने पोलिसांना खबर देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक युवक महेश स्वार यांनी कालव्यात उतरून मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना मदत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी साटेली भेडशी ग्रामीण रुग्णालयात आणला.मात्र,त्याचा साथीदार बेपत्ता असल्याची माहिती मुकादमाने पोलिसांना दिली. मृताच्या कपाळावर जखमा दिसून आल्या .त्याचा मृत्यू नक्की नशेच्या अवस्थेत पाण्यात पडून झाला की घातपात ? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!