उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार योजनेंसाठी अर्ज करण्याचे आवाहन

उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार योजनेंसाठी अर्ज करण्याचे आवाहन

*कोंकण एक्सप्रेस*

*उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार योजनेंसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*

 जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे,चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतून जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना सन १९८५ पासून कार्यान्वित केली आहे.या योजनेअंतर्गत सन २०२४ च्या पुरस्कारांसाठी पात्र सूक्ष्म व लघु उद्योजकांनी ३१  जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे,आवाहन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत प्रथम पुरस्‍कार रोख रु.१५  हजार आणि व्दितीय पुरस्‍कार रोख रु.१० हजार सन्‍मानचिन्‍ह,शाल व श्रीफळ देऊन समारंभपूर्वक गौरविण्‍यात येणार आहेत. विहीत नमून्‍यातील अर्ज जिल्‍हा उद्योग केंद्र,सिंधुदूर्ग येथे उपलब्ध आहेत.

पुरस्‍कार करण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे.१)अर्जदार घटक या जिल्ह्यातील दि. ०१/०१/२०२१ रोजी किंवा त्‍यापुर्विचा स्‍थायी लघु उद्योग नोंदणीकृत / पार्ट-२ ज्ञापन स्‍वीकृतीधारक घटक असावा.२)अर्जदार घटक मागील दोन वर्षे सलग उत्‍पादनात असावा.३) अर्जदार घटकास कोणत्‍याही बॅंकेचा अथवा वित्‍तीय संस्‍थेचा थकबाकीदार नसावा.४)अर्जदार घटक यापूर्वी राष्‍ट्रीय / अंतरराष्‍ट्रीय अथवा जिल्‍हा पुरस्‍कार मिळालेला नसावा.५) निर्याताभिमुख घटक / महिला उद्योजक / मागासवर्गीय उद्योजक यांना प्राधान्‍य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!