*सकाळचे बातमी अपडेट / ०१ मार्च सोमवार*

 *सकाळचे बातमी अपडेट / ०१ मार्च सोमवार*

*कोकण Express*

 *सकाळचे बातमी अपडेट / ०१ मार्च सोमवार*

◾ राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची – काल राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे

◾ पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत , पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम असेल – तर शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच राहतील – असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले

◾ केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी , GST म्हणजे वस्तू व सेवा कराचा वार्षिक रिटर्न भरण्याची मुदत वाढवून 31 मार्चपर्यंत केली आहे – काल केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली

◾ कोरोना सोबत राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लूने सुद्धा डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर नंदूरबारमधील नवापूर तालुक्यात देशातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन सुरु आहे.

◾ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह – 4 रविवार आणि 2 शनिवारी मुळे एकूण ८ दिवस बँकांना सुट्टी असेल – त्यामुळे बँका बंद राहतील

◾ *परीक्षा निकाल अपडेट* – मुंबई उच्च न्यायालयच्या 182 पदाच्या लिपिक भरतीचा निकाल उपलब्ध झाला – bit.ly/3r4Oi8G

◾ शेतकऱ्यांनी 1 मार्चपासून दुधाची किंमत 100 रुपये प्रति लिटर करण्याचा निर्णय घेतला आहे – असे सतरोल खापचे प्रमुख रामनिवास लोहान यांनी सांगितले

◾ शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! – वरिष्ठानी दिलेल्या माहितीप्रमाणे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची रक्कम 10 एप्रिलाच्या सुमारास पाठवणार

◾ वाशिममध्ये दिलेल्या जमावबंदीच्या आदेशाला ८ मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे – याबाबतचा आदेश जिलाधिकाऱ्यानी दिलेत

◾ आज 1 मार्च 2021 पासून ,विजया आणि ई-देना या बँकांचे जुने आईएफएससी कोड बंद होतील – नवा आयएफएससी कोड हवा असेल तर बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तो मिळवता येईल

◾ आजपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे , दरम्यान देशात ज्या रुग्णालयांमध्ये जन आरोग्य योजना , तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजना राबवल्या जातात , तिथे हे लसीकरण होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!