भारताचे संविधान अधिक सुदृढ करण्यासाठी संविधान प्रती युवा वर्गाला जागृत करण्याची गरज – प्रा.डॉ. सुनील भिसे

भारताचे संविधान अधिक सुदृढ करण्यासाठी संविधान प्रती युवा वर्गाला जागृत करण्याची गरज – प्रा.डॉ. सुनील भिसे

*कोंकण एक्सप्रेस*

*भारताचे संविधान अधिक सुदृढ करण्यासाठी संविधान प्रती युवा वर्गाला जागृत करण्याची गरज – प्रा.डॉ. सुनील भिसे* 

*संविधान गौरव अभियान अंतर्गत भाजपा युवा मोर्चा ,वेंगुर्ले च्या वतीने वस्तीगृहात चर्चासत्राचे आयोजन*

*वेंगुर्ला :प्रतिनिधी*

भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने वेंगुर्ला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह ,वेंगुर्ला येथे संविधान गौरव अभियान अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शिवाजी महाराज,फुले ,शाहू ,आंबेडकर या समतेचे महामेरू असणाऱ्या महामानवांच्या व संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन कारण्यात आले.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कुणाल इंदलकर सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रस्ताविक किशोर खरात यांनी केले तर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.डॉ.सुनील भिसे सर यांनी वसतिगृहातील मुला-मुलींना संविधानाचे महत्व पटवून दिले तसेच भारतीय संविधान हे मानव जातीसाठी कसे प्रेरक ठरत आहे.आणि त्याची ७५  वर्षाची वाटचाल आपल्याला कशी मार्गदर्शन ठरत आहे.याबाबत आपलं मत मांडले. तसेच विदयार्थ्यानी  विद्यार्थी दशेत असताना संविधान वाचलं पाहिजे.देशाला अजून प्रगतीपथावर कस घेऊन जाता येईल यासाठी काम केल याबाबत आपले मत व्यक्त केले.

यावेळेस कार्यक्रमाला डॉ. कुणाल इंदलकर ,प्रा.डॉ.सुनील भिसे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रसन्ना देसाई ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रणव वायंगणकर,जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष हेमंत गावडे व भूषण आंगचेकर,पिंटू सावंत,संतोष सावंत,मनोहर तांडेल,सुधीर पालयेकर,किशोर खरात व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!