*कोंकण एक्सप्रेस*
*वृध्दाश्रमाला देणगी म्हणून दिला चक्क लग्नातील आहेर ! : खारेपाटणच्या अनंत चव्हाण यांचे मोलाचे कार्य*
*तळेरे : प्रतिनिधी*
आपल्या चारही मुलांच्या लग्नातील आहेर, गोरगरीब व वृध्दाश्रमाला दान करणारे निस्वार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटणचे आदर्शवान, नाभिक बांधव अनंत भिकाजी चव्हाण यांनी, मुलगा भिकाजी उर्फ ओमकार यांच्या लग्नात मिळालेला आहेर असलदे (ता. कणकवली) येथील दिवीजा वृध्दाश्रमाला देणगी देऊन समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निस्वार्थी निर्णयांचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संघठक व सिंधुदुर्ग नाभिक संघटणेतर्फे विजय सिताराम चव्हाण यांनी कौतुक केले आहे.
सिंधुदुर्ग नाभिक समाजाचे कणकवली माजी तालुकाध्यक्ष अनंत भि. चव्हाण हे गरीब कुटुंबातील नाभिक बांधव. खारेपाटण बाजारपेठेतील सलुन व्यवसायावर उपजिविका करणारे प्रामाणीक आणि समाजप्रिय बांधव. अशा या नाभिक बांधवांने आपल्या तिन्हीही मुली स्व:ताच्या व मुलींच्या ईच्छेप्रमाणे सुलुन काम करणार्या नाभिक बांधवा बरोबर लग्न करुन देऊन समाजात एक नवा संदेश दिला. एवढ्यावरही न राहाता त्या तिन मुलींच्यालग्नाचा आहेर कोणतीही प्रसिध्दी न मिळवता गोरगरीबांसाठी अनाथ आश्रमाला दिला. व मुलगा भिकाजी उर्फ ओमकार याच्याही लग्नात मिळालेला आहेर असलदे (ता. कणकवली) येथील दिवीजा वृध्दाश्रमाला दान करुन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. या त्यांच्या कार्याबद्दल, नाभिक समाजाचे नेते विजय सि. चव्हाण व राज्याचे सरचिटणीस राजन पवार यांनी अनंत चव्हाण यांचे कौतुक केले.
यावेळी विवेक परब, संतोष अपराज, गणेश चव्हाण, सौ. चव्हाण, व वृध्दाश्रमातील सर्व वृद्ध व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. दिवीजा वृध्दाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी अनंत चव्हाण यांचे व उपस्थितांचे विशेष आभार मानले.