*कोंकण :एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गात अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामार्फत महाआरोग्य शिबिर संपन्न*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी कणकवली व वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा असे तीन तालुक्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सोमवार मंगळवार बुधवार या वेगवेगळ्या दिवशी अथायु मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर झाले होते.या शिबिरामध्ये रुग्ण तपासल्यानंतर त्यांची पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना कोल्हापूर येथे बस सेवा मोफत करण्यात आली.यामध्ये शस्त्रक्रिया जेवण व औषधे मोफत देण्यात येणार आहे.अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली आहे
यावेळी अनेक रुग्णांनी जिल्ह्यातील तपासणी करून त्या हॉस्पिटल तर्फे सर्व सामान्य रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी या अथायु हॉस्पिटल तर्फे मोफत बस सेवा दिली आहे यावेळी कणकवली सावंतवाडी व शिरोडा या तालुक्यातील अनेक रुग्ण तपासणी करून त्यांना कोल्हापूर अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये मोफत बस सेवेने रुग्ण व त्यांचे एक नातेवाईक कोल्हापूर येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आले.
त्यांच्यावरती योग्य ती शस्त्रक्रिया औषधे व जेवण या रुग्णांसाठी महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात येणार आहे यामध्ये हृदयाची शस्त्रक्रिया एन्जोप्लास्टी बायपास सर्जरी मुतखड्याच्या शस्त्रक्रिया प्रोस्टेल शस्त्रक्रिया कॅन्सर शस्त्रक्रिया व केमो हाडांचे शस्त्रक्रिया व्हेरिकोज व्हेन्स शस्त्रक्रिया हृदयाच्या वॉल बसवणे अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत होत असतात.सात आठ वर्षे या जिल्ह्यामधून हजारोंच्या संख्येने शस्त्रक्रिया हे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांच्याकडून या अथायु मल्टी स्पेशलिस्ट या हॉस्पिटल करून गोरगरीब रुग्णच्या करून घेण्यात आलेले आहेत.हे महा आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.