*कोंकण एक्सप्रेस*
*दशांश अपूर्णांक ऑलिंपिक स्पर्धेत वेंगुर्ले केंद्रशाळा विजेती*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
शालेय गणित सुधार उपक्रमांतर्गत अध्ययन संस्था मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय दशांश अपूर्णांक ऑलिंपिक स्पर्धेत वेंगुर्ले केंद्र शाळा नं. १ या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत प्रशालेतिल वेद वेंगुर्लेकर,द्वारका राऊळ,वेदांत नाईक,सार्थक यादव,मयंक नंदगडकर,निल पवार,परिणीता केरकर,अवनी हरमलकर,कौस्तुभ परब,तन्मय शितोळे हे विद्यार्थी सहभागी झाले होते.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर यांनी कौतुक केले.