*कोंकण एक्सप्रेस*
*सातुळी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या खुल्या भजन स्पर्धेत नेरूरच्या श्री मोरेश्वर प्रासादीक भजन मंडळ (बुवा भार्गव गावडे) याने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत कोंडुरा येथील श्री देव सिद्धेश्वर प्रासादीक भजन मंडळ (बुवा वसंत पेडणेकर) याने द्वितीय क्रमांक, पिंगुळीच्या श्री महापुरुष प्रासादीक महिला भजन मंडळ (बुवा प्रसाद आंबडोसकर) याने तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी भोगवेच्या श्री महापुरुष प्रासादीक भजन मंडळ (बुवा तुषार खुळे) यांनी प्राप्त केला. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले
या भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, चौकुळचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे, मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, गोसोर्स कंपनीचे सीईओ संतोष कानसे, सरपंच सोनाली परब, उपसरपंच स्वप्निल परब, माजी सरपंच उत्तम परब, आंबोली पोलीस अंमलदार दत्तात्रय देसाई, सामाजिक कार्यकर्ते दया परब, पोलीस पाटील आबा परब, पोलीस पाटील अरुण परब, शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत गावडे, दाणोली माजी उपसरपंच प्रशांत सुकी, भजन स्पर्धेचे परीक्षक संजय दळवी, डॉ. दादा परबआदी मान्यवर उपस्थित होते.