*कोंकण एक्सप्रेस*
*दोन फेब्रुवारीपासून तिसरी श्रीमंत पेशवाई चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव, श्री हनुमान मित्र मंडळ, मारुती आळी, रत्नागिरी आयोजित व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ३ री श्रीमंत पेशवाई चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ रोजी राधाकृष्ण मंदीर, राधाकृष्ण नाका, रत्नागिरी येथे दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ ते ०३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे.
सदर स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महीला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट व किशोरी गट अशा सात गटात होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी एकेरी गटासाठी १५०/- रुपये, दुहेरी गटासाठी २००/- व कुमार कुमारी किशोर व किशोरी गटासाठी १००/- रुपये याप्रमाणे राहील. प्रत्येक गटात किमान आठ स्पर्धक असणे आवश्यक आहे अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल.या वर्षातील हि ७ वी स्पर्धा आहे .जे खेळाडू यावर्षी कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही त्या खेळाडूंनी २०२४-२५ या वर्षाची रजिस्टेशन फी रुपये ५०/- जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका बुधवार दिनांक २९ जानेवारी २०२५ पर्यंत द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.