*कोंकण एक्सप्रेस*
*” इंडियन आर्मी डे ” बॅ.खर्डेकर महाविद्यालयात उत्साहात साजरा*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटद्वारे “इंडियन आर्मी डे” च्या निमित्ताने वेंगुर्ला शहरात एन.सी.सी. संचलन व देशभक्तीपर पथनाट्य सादर करून आर्मी डे साजरा करण्यात आला.आर्मी डे १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो आणि या दिवशी भारतीय सैन्यदलाच्या लष्करी परंपरेला मान आणि गौरव दिला जातो. या दिवशी भारतीय सैन्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण साजरा केला जातो. कारण १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल के.एम.करियप्पा यांनी भारतीय लष्कराचे कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता.
यामुळे भारतीय लष्कराच्या नेतृत्वामध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आणि भारतीय सैन्याची स्वायत्तता व गौरव वाढला.आर्मी डे हा दिवशी,भारतीय सैन्याच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेच्या कर्तव्याची ओळख दिली जाते,तसेच सैनिकांच्या योगदानाचे महत्त्व दर्शवले जाते.याव्यतिरिक्त, विविध ठिकाणी सैन्याच्या शौर्याच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित केले जातात.याचाच एक भाग म्हणून खर्डेकर कॉलेज च्या एनसीसी विभागाकडून आर्मी डे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी सिंधुदुर्गचे पदाधिकारी सुभेदार साहू साहेब यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी.चौगले यांच्या हस्ते तर सी.एच.एम.राकेश पटेल यांचा तरुण भारत सिंधुदुर्ग – रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला; तर दिल्ली येथे आयोजित भारतीय थलं सेना कॅम्प मध्ये महाविद्यालय व ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी सिंधुदुर्गचे यशस्वी प्रतिनिधित्व केल्यामुळे कॅडेट सोनाली चेंदवणकर,व दिव्या दळवी यांचा सुभेदार साहू व सी.एच.एम.राकेश पटेल यांनी प्रोत्साहनपर सत्कार केला.यावेळी मंचावर तरुण भारतचे पत्रकार भरत सतोसकर,पत्रकार महेंद्र मातोंडकर,दै.सकाळ दीपेश परब,दै.पुढारी अजय गडेकर व नवप्रभात न्यूज चे योगेश तांडेल यांचे उपस्थित होते.
. तत्पूर्वी एन.सी.सी कॅडेटसनी बॅरिस्ट बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय येथून संचलनपर रॅली काढून वेंगुर्ला नगरपरिषदेच्या समोर देशभक्तीपर पथनाट्य सादरीकरणातून समाजिक ऐकतेचा संदेश दिला.या रॅली मध्ये महाविद्यालयाचे प्रा.ए.बी.नरगच्चे,डॉ.व्ही. एम.पाटोळे,एस.एन.बोरावडेकर एल. बी.नैताम,राम चव्हाण,व धीरज पाचपिले यांनी सोबत करून रॅली यशस्वी करण्यास सहकार्य केले.सदर रॅली आयोजित करण्यास एन.सी.सी.ऑफिसर ले.बी.जी गायकवाड यांनी पुढाकार घेतला. शिक्षण प्रसारक मंडळाचे चेरमन डॉ. मंजिरी मोरे,सेक्रेटरी जयकुमार देसाई पेट्रन कॉन्सिल मेंबर दौलत देसाई,व प्राचार्य डॉ.एम.बी चौगले यांनी प्रोत्सहान दिले.