*कोंकण एक्सप्रेस*
*व्यावसायिक शिवाजी गवस यांचा ६४ वा वाढदिवस आंबेली- कोनाळकरवाडी शाळेत विद्यार्थ्यांसह उत्साहात साजरा*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
आंबेली कोनाळकरवाडी येथील व्यावसायिक शिवाजी गोपाळ गवस यांनी गेली पाच वर्ष सातत्याने आपला वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करत समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.वयाची ६० वर्षे पूर्ण झाली.त्यावेळी कुटुंबीयांसमवेत वाढदिवस साजरा न करता शाळेतील मुलांसोबत वाढदिवस साजरा करावा व शाळेला आवश्यक असणारी भेटवस्तू प्रदान करावी ही संकल्पना गवस कुटुंबियांनी हाती घेतली व शिवाजी गवस यांचा ६० वाढदिवस शाळेत पाच वर्षांपूर्वी साजरा केला. ही परंपरा त्यांनी कायम ठेवली असून गेली पाच वर्ष सातत्याने वाढदिवस साजरा होत आहे.
आज ६४ वा वाढदिवस त्यांनी आंबेली कोनाळकरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.यावेळी त्यांच्या पत्नी सौ.शितल शिवाजी गवस, मुलगी संजना शिवाजी गवस, चिरंजीव संकेत शिवाजी गवस यांच्यासह मुख्याध्यापिका सौ.पल्लवी पनवेलकर मॅडम व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.आपली परंपरा कायम ठेवत यावर्षीही त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना केक वाटप तथा खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप व शाळेसाठी परसबागेतील पाणी शिंपण्यासाठी भांडे भेटवस्तू प्रदान केली.व्यावसायिक शिवाजी गवस व त्यांच्या कुटुंबियांच्या या संकल्पनेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.