*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग तालुक्यातील कलाकारांचा महाराष्ट्र फाऊडेशन पुणे यांचा तर्फे सत्कार*
*दोडामार्ग : शुभम गवस*
तालुक्यातील मालवणी,मराठी मालिका व युट्युब च्या माध्यमातुन लोकांच्या हृदयामध्ये ज्यांनी घर केले.स्वामी माऊली प्रॉडक्शन युट्युब चैनल च्या माध्यमातून हजारो लोकांना हसवल.आपल्या विनोदी नाट्यमय शैलीतून तालुक्यातच नव्हे तर तालुक्या बाहेर ही आपली ओळख निर्माण करणारे ,असे दोडामार्ग तालुक्याचे दोन सुपुत्र मा. विकास रघुनाथ तर्पे आणि मा.करण कृष्णा कुंभार या दोघांच्या कलेचा सत्कार करण्यात आला.हा सत्कार महाराष्ट्र फाऊडेशन पुणे यांचे तर्फे विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र योद्धा राज्यस्तरीय सन्मानित पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार वितरण सोहळा आळंदी येथे पर पडला.
यावेळी वेळी महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. आकाश पुजारी.जयसिंग तात्या शेंडगे अध्यक्ष धनगर साहित्य परिषद,शिवशेनेचे नेते बाळासाहेब किशवे व्हीजे एनटी प्रदेश अध्यक्ष शेळी मेंढी विकास महामंडळ तथा राज्य मंत्री दर्जा माजी नगरध्यक्ष राहुल चिताळकर पाटील. शमदनरेनगडे परभणी जिल्हा अध्यक्ष शिवसेना. डॉ राहुल साळवी, अॅड चेतन्य केंगार, आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मैदनकर पत्रकार श्रीकांत बोरावके, पत्रकार अनिल जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते लिणबाजी ढाके आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या उपस्थिती पुरस्कार सोहळा उत्साहात साजरा झाला.