*कोंकण एक्सप्रेस*
*स्वराज्य सरपंच सेवासंघ दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी अनिल शेटकर यांची बिनविरोध निवड*
*दोडामार्ग : शुभम गवस*
स्वराज्य सरपंच सेवा दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी झरे आंबेलीचे सरपंच अनिल शेटकर यांची बिनविरोध निवड झाली.सरपंच सेवा संघाची दोडामार्ग तालुका कार्यकारणीची जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली.
अध्यक्षपदी अनिल दत्ताराम शेटकर, कार्याध्यक्षपदी आपा वसंत गवस,सचिवपदी तेजस तुकाराम देसाई, सोशल मीडिया प्रमुख पराग गावकर तालुका संघटक संतोष मोर्ये, उपाध्यक्ष अजित देसाई,उपाध्यक्ष (महिला) संजना सचिन धुमास्कर,सुजल सूर्यकांत गवस,उपाध्यक्ष हरिश्चंद्र गंगाराम नाईक,प्रवीण पांडुरंग गवस,उपाध्यक्ष (महिला) छाया धर्णे,सहसचिव सुरेंद्र सावंत,सहमीडिया प्रमुख प्रथमेश गजानन मणेरीकर, सल्लागार रत्नाकांत कर्पे, उपसंघटक संतोष आईर सदस्य – मोहन गवस,श्याम नाईक,वंदना सावंत,स्नेहा गवस, सोनाली गवस,श्रीनिवास शेटकर तर जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष शेटये,साक्षी देसाई,श्रुती देसाई,राजेंद्र गवस यांची निवड करण्यात आली.बैठकीचे सूत्रसंचालन पराग गावकर, प्रास्ताविक प्रवीण गवस यांनी केले तर आभार राजेंद्र गवस यांनी मानले.