*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा देवबागमध्ये भाजपा आणि उबाठाला धक्का*
*उपसरपंचांसह भाजपा ग्रा. पं. सदस्य, माजी पं. स. सदस्य व कार्यकर्त्यांचा समावेश*
*मालवण : प्रतिनिधी*
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी देवबाग गावात ठाकरे शिवसेनेसह भाजपला धक्का दिला आहे. येथील उबाठा उपसरपंच ताता बिलये यांच्यासह भाजप ग्रामपंचायत सदस्य हेमंत बांदेकर, स्वरा तांडेल, माजी पं. स सदस्या मधुरा चोपडेकर, माजी उपसरपंच नादार तुळसकार, मकरंद चोपडेकर, बाबली चोपडेकर, बाबु कासवकर, बुध अध्यक्ष नितीन बांदेकर संकेत राऊळ, दिनू कासवकर, गुंडू तांडेल, दाजी कुमठेकर, चैतन्य वालावालकर, भरत राऊळ, दिलीप पेडणेकर, विली ब्रिटो, बाबा कुमठेकर आदी भाजप कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.