*कोंकण एक्सप्रेस*
*प.पू.भालचंद्र बाबांच्या जन्मोत्सवास जनसागर उसळला*
*पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल*
*भव्य मिरवणुकीने उत्सवाची सांगता*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली येथील परमपूज्य भालचंद्र बाबांच्या १२१ व्या जन्मोत्सवानिमित्त गेले पाच दिवस कणकवली नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन न करण्यात आले होते.भालचंद्र बाबा संस्थानच्या वतीने प्रतिवर्षप्रमाणे भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.हजारो भाविकांनी या कार्यक्रमांसह महाप्रसादाचा लाभ घेतला.


सोमवारी सायंकाळी ढोल ताशाच्या गजरात बाबांच्या भव्य मिरवणुकीने या सोहळ्याची सांगता झाली. ढालकाठी मार्गे संपूर्ण बाजारपेठेतून तेली आळी येथून शिवाजी चौकातून परत बाबांच्या मठापर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. यावेळी ठिकठिकाणी बाबांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. बाबांच्या अखंड नामघोषाने कणकनगरी दुमदुमून गेली होती.

