निरवडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत लक्ष्मीनारायण वालावल संघ विजेता

निरवडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत लक्ष्मीनारायण वालावल संघ विजेता

*कोंकण एक्सप्रेस*

*निरवडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत लक्ष्मीनारायण वालावल संघ विजेता 

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

निरवडे येथील आमंत्रित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री लक्ष्मीनारायण वालावल संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना रोख १५ हजार आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.श्री देव महापुरुष मित्रमंडळ व निरवडे व हौशी कबड्डी संघटनेच्या सौजन्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पंचक्रोशी फोंडा यांनी तर तृतीय क्रमांक पंचक्रोशी जामसंडे देवगड,चतुर्थ क्रमांक शिवदैवत शिवदैवत नेरूरपार यांना मिळाले.

या स्पर्धेत वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट चढाईपट्टू निखिल चव्हाण (वालावल), उत्कृष्ट पक्कड शुभम नार्वेकर (फोंडा) आणि स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू योगेश घाडी (वालावल) यांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे आणि सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन माजी खासदार विनायक राऊत आणि सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऍड अनिल निरवडेकर, सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, माजी सरपंच सदा गावडे, माजी सभापती प्रियंका गावडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गावडे, सुभाष गावडे, लाडू गावडे, रवी जाधव, भिकाजी गावडे, गोविंद मोर्ये, विजय गावडे, नागेश गावडे, संतोष गावडे, अक्षय माशाळ, ओमप्रकाश तिवरेकर, सुनील माळकर, चंदन गोसावी, विशाल पोपकर, सचिन माळकर, चेतन माळकर, संदेश पोपकर आदी उपस्थित होते. तसेच या स्पर्धेला तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, माजी सभापती पंकज पेडणेकर, कास सरपंच प्रवीण पंडित यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्पर्धेला भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!