*कोंकण एक्सप्रेस *
*७५ व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त कणकवली तालुक्यातील सर्वांसाठी / सर्व शाळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
७५ व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त कणकवली तालुक्यातील सर्वांसाठी / सर्व शाळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार दिनांक २२ जानेवारी २०२५ सकाळी ९.०० वाजता विद्यामंदिर प्रशाला कणकवली येथे निबंध व चित्रकला स्पर्धाचे आयोजन करणेत आलेले आहे. सदरील स्पर्धा चार गटामध्ये होणार असून गट १ .पहिली ते चौथी ,गट २ .पाचवी ते सातवी ,गट ३ .आठवी ते दहावी आणि गट ४. महाविद्यालयीन गटामध्ये होतील.
गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी समुहगान स्पर्धा सकाळी १०.०० वाजता नगर वाचनालय हॉल कणकवली येथे आयोजीत करण्यात आली आहे.सदरील स्पर्धा चार गटामध्ये होणार असून गट १ .पहिली ते चौथी ,गट २ .पाचवी ते सातवी ,गट ३ .आठवी ते दहावी गटामध्ये होतील.रांगोळी स्पर्धा शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता एच.पी.सी.हॉल कणकवली कॉलेज कणकवली येथे शालेय गट आणि महाविद्यालयीन गटामध्ये होतील.रांगोळी स्पर्धामधील रांगोळीचे प्रदर्शन २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजल्यानंतर चालु होईल.