जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती खेड्यापाड्यात होणे आवश्यक- विरसिंग वसावे

जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती खेड्यापाड्यात होणे आवश्यक- विरसिंग वसावे

*कोंकण एक्सप्रेस*

*जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती खेड्यापाड्यात होणे आवश्यक- विरसिंग वसावे*

*कुडाळात अनिस आणि पीआयएमसी समितीच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*कुडाळ : प्रतिनिधी*

महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा याची खेड्यापाड्यात जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कुडाळचे तहसिलदार विरसिंग वसावे यांनी केले. जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग व अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांचे संयुक्त आयोजित एकदिवसीय प्रात्यक्षिकासह कार्यशाळेचे कुडाळमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी श्री.वसावे बोलत होते.

यावेळी कुडाळ पोलिस निरिक्षक राजेंद्र मगदूम, कुडाळ हायस्कूल मुख्याध्यापक महेश ठाकूर,अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदूर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड राजीव बिले, जिल्हा संघटक विजय चौकेकर, जिल्हा सरचिटणीस प्रा.अजित कानशिडे,जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.संजिव लिंगवत,जिल्हा संघटक सौ रूपाली पाटील ,कुडाळ तालुकाध्यक्ष ॲड समिर कुळकर्णी,प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ डाॅ रूपेश धुरी,रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डाॅ संजय केसरे,क्रेडाई सिंधुदुर्गचे गजानन कांदळगावकर , कुडाळ रोटरी सेवा प्रतिष्ठानचे राजन बोभाटे,कुडाळ कार्याध्यक्ष सचिन मदने,महिला संघटक उज्वला येळाविकर ,कणकवली तालुकाध्यक्ष भगवान तांबे ,देवगड उपाध्यक्ष कांबळे ,वेंर्गुला उपाध्यक्ष सौ सिमंतनी मयेकर,कुडाळ सचिव ॲड. हेमांगी वराडकर,खजिनदार ॲड.गौरी आपटे,कुडाळ उपाध्यक्ष ॲड.संजय खानोलकर,संघटक ॲड.राजीव कुडाळकर,सावंतवाडी संघटक नयना पांचाळ,कणकवली संघटक स्नेहा महाडिक,सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त पेन्शनर्स असोसिएशनचे श्री. आंबेरकर,कल्याण कदम आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस निरिक्षक राजेंद्र मगदूम म्हणाले,जादूटोणा विरोधी कायदा २०१३ व वैज्ञानिक दृष्टीकोन जनजागृतीसाठी पोलिस कर्मचा-यांचे सर्वोतोपरी सहकार्य करणार.अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदूर्गचे कार्य हे समाजामधील सुरू असलेल्या अंधश्रध्दा निर्मूलनबाबत जनजागृती करणे आहे कुणाला संपवणे नाही. महात्मा गांधीजींच्या आश्रमात न जाता आसाराम बापू सारख्या भोंदू महाराजांच्या आश्रमाकडे लोक जास्त गर्दी करून जातात हे दुर्देव आहे.वेंगुर्ला येथील १६  वर्षीय जटायुक्त त्रस्त मुलीला जटामूक्त करून नवीन आयुष्य अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदूर्गकडून देण्यात आले हे आमचे कार्य आहे. अशा अनेक ज्वलंत अंधश्रध्देबातची उदाहरणे देत संघटनेचे कार्य अधोरेखित करतानाच युवकांनी पुढे येवून संघटनेचे सदस्य व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड.राजीव बिले यांनी व्यक्त केले.

अंगात येणं हा मानसिक आजार आहे तो वैद्यकीय दृष्ट्या सिंध्द झाला आहे पण समाजात याबाबत असलेली अंधश्रध्दा दूर होणं आवश्यक आहे ,समाजातील गरिब -श्रीमंत रूढीमध्ये लपलेली अंधश्रध्दा दूर होणे आवश्यक आहे.मूक्या प्राण्यांचा बळी देवून मनातील विश्वास नि भावना पूर्ण करणे ही अंधश्रध्दा दूर होणे आवश्यक अशा अनेक दैनंदिन उदाहरणे देत मानसिक आरोग्य आणि अंधश्रध्दा या विषयावर मार्गदर्शन सिंधुदुर्गचे प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ डाॅ रूपेश धुरी यांनी केले.

कार्यशाळेस पोलिस उप अधिक्षक विनोद कांबळे यांनी सदिच्छा भेट देत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदूर्गचे कार्य कौतुकास्पद आहे.समाजातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा २०१३ ची जनमाणसात प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे.यासाठी पोलिस विभागाचे सहकार्य देवू असे आश्वस्त उप अधिक्षक विनोद कांबळे यांनी व्यक्त केले.मूठ मारणे, जादूटोणा, करणी,मंत्र तंत्र,देवी अंगात येण,अघोरी प्रथा,बुवाबाजी अशा अनेक अंधश्रध्देबाबत प्रात्यक्षिकासह जादूटोणा कायदा 2013 ची जनजागृती शाळाशाळांमध्ये होणे आवश्यक असल्याचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी सांगितले.वैज्ञानिक दृष्टीकोन विषयावर संत राऊळ महाराज महाविद्यालयचे प्राध्यापक तथा जिल्हा सचिव अजित कानशिडे यांनी मार्गदर्शन केले. तर भूताटकी आणि अंधश्रध्दा विषयावर जिल्हाध्यक्ष ॲड. राजीव बिले ,साप आणि अंधश्रध्दा वर सर्पमित्र अनिल गावडे ,विविध श्रध्दा -अंधश्रध्दा विषयावर जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत अनेक प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.उदघाटनवेळी तेलाशिवाय समई प्रज्वलन करून प्रात्यक्षिकाची सुरूवात झाली.जादूटोणा विरोधी कायदा २०१३  पुस्तिका देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!