*कोंकण एक्सप्रेस*
*कीर्तनकारांच्या अपमानाचा निषेध – ह.भ.प. संजय पुनाळेकर*
*कणकवली : प्रतिनिधी*
एका डबलबारी कार्यक्रमामध्ये विनोद चव्हाण या डबलबारी बुवांनी ह. भ. प. या किर्तनकारांच्या उपाधीचा उल्लेख अत्यंत हीन आणि निंदनीय शब्दांमध्ये केला. त्यामुळे समस्त कीर्तनकारांचा आणि नवविद्या भक्तितील किर्तन या, ईश्वर भक्तीच्या माध्यमाचा अपमान झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील सुमारे 200 कीर्तनकारांची संघटना असलेल्या भगवद्भक्ती प्रबोधिनीचे अध्यक्ष ह.भ.प. संजय पुनाळेकर यांनी या गोष्टीचा तीव्र शब्दात्त निषेध केला आहे.
विनोद चव्हाण यांनी आपल्या या कृतीबद्दल जाहिर माफी मागितली आहे. समाजामध्ये भजन, किर्तन, डबलबारी इत्यादी गोष्टी सादर करीत असताना कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य न करण्याचे भान सर्वांनी ठेवावे असे याप्रसंगी संजय पुनाळेकर यांनी स्पष्ट केले आहे.