*कोंकण एक्सप्रेस*
*एसटी प्रशासनाची मनमानी : चालक आजारी असताना जबरदस्तीने ड्यूटी करण्यास भाग पाडले*
*संबंधितांवर ८ दिवसात कारवाई न केल्यास राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा सुनील डुबळे यांचा इशारा*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
“बहुजन हिताय बहुजन सुखाय” हे ब्रीद पाळून प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्याचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असताना आणि कर्मचारी जर खरोखरच आजारी असताना त्याकडे हेतू पुरस्कर व मनमानीपणे दुर्लक्ष करून स्वतःच्या अधिकाराचा वरिष्ठांना विश्वासात न घेता गैरवापर करणाऱ्या जो प्रकार घडला आहे तो हेतू पुरस्कार आहे. प्रवासात काही अनर्थ घडल्यास एसटी बस व एसटीतील सर्व प्रवासी वर्ग यांची जबाबदारी लेखी स्वरूपात वरिष्ठांचे अधिकार स्वतः वापरून पत्र देणाऱ्या सावंतवाडी आगाराच्या वाहतूक निरीक्षक प्रांजल धुरी यासह आगार व्यवस्थापक निलेश गावित व बस स्थानक प्रमुख राजाराम राऊळ यांची तात्काळ चौकशी होऊन त्यांच्यावर सिंधुदुर्ग चे विभागीय नियंत्रक यांनी कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे अध्यक्ष सुनील डुबळे यांनी वेंगुर्लेत आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.दरम्यान,येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास त्यानंतर कधीही राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सुनील डुबळे यांनी व्यक्त केला आहे.
सावंतवाडी आगारातील राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे सचिव चालक शिवराम मुळीक यांची दि.१५ जानेवारी रोजी तब्येत बिघडलेली असताना त्यांना सावंतवाडी पुणे हे सुमारे ४५० किलोमीटर लांब पल्याच्या प्रवासाची बस घेऊन जाण्याची जबरदस्ती करण्यात आली.चालक शिवराम मुळीक हे आपली तब्येत ठीक नसल्याचे व अस्वस्थ अधून मधून वाटत असल्याचे वाहतूक निरीक्षक प्रांजल धुरी तसेच आगार व्यवस्थापक निलेश गावित व बस स्थानक प्रमुख राजाराम राऊळ यांना सांगितले.मात्र वहातुक निरीक्षक प्रांजल धुरी यांनी जबरदस्तीने सदर गाडीवर तुम्हाला जायला पाहिजे अशी जबरदस्ती केली.त्यावेळी माझ्या माझी तब्येत बिघडून वाटेत काही अनर्थ घडल्यास त्यासाठी जबाबदार कोण राहणार असे विचारले.त्याबाबत मला लेखी पत्र द्यावे अशी नाईलाजाने मागणी केली.त्यानुसार वाहतूक निरीक्षक प्रांजल धुरी यांनी लेखी पत्र देत त्यावर स्वतःच्या सहीसह साक्षीदार म्हणून आगार व्यवस्थापक निलेश गावित व बस स्थानक प्रमुख राजाराम राऊत यांच्या स्वाक्षऱ्या करून तसे लेखी पत्र चालक शिवराम मुळीक यांना देण्यात आले. त्यामुळे तब्येत बरी नसतानाही दि.१५ जानेवारी रोजी त्यांनी सावंतवाडी आगारातून सावंतवाडी-पुणे हे बस मार्गस्थ केली.सदर बस कोल्हापूरला बस स्टँडवर पोहोचल्यानंतर त्यांची तब्येत ढासळली आणि त्यांना अस्वस्थता वाटू लागली. त्यामुळे तेथील एसटी अधिकारी यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.जर चालक शिवराम मुळीक यांची प्रवासात तब्येत ढासळली असती अन अनर्थ घडला असता तर सावंतवाडी आगाराचे हे तीन अधिकारी एसटी सह त्या प्रवाशांचे नुकसान भरून देऊ शकणार होते काय असा सवाल निर्माण होत आहे.
यापूर्वी ३ जुलै २०२३ रोजी अशाच प्रकारचा अन्याय हा चालक शिवराम मुळीक यांच्यावर झालेला होता, याची कल्पनाही या तिन्ही अधिकाऱ्यांना होती त्यावेळी शिवराम मुळीक यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीनुसार दोषी ठरलेल्या पाच अधिकाऱ्यांवर सिंधुदुर्ग विभागाचे नियंत्रक यांचे कडून कारवाई करण्यात आले होती.राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे सावंतवाडी आगार राहतील तालुका सचिव हे संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांच्यावर प्रामाणिक कारण काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठत असल्याने व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देत असतात. त्याचा राग मनात ठेऊन थांब पल्ल्याच्या रूटची एसटी बस नेण्यास प्रांजल धुरी यांनी हेतू पुरस्कार त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने ४५० किलोमीटर भाग पाडले. सावंतवाडी पुणे या गाडीला जबरदस्तीने ड्युटी लादली. एस टी महामंडळाच्या नियमानुसार ३०० किलोमीटर पेक्षा जास्त असलेल्या लांब पल्ल्याच्या डुटीसाठी दोन चालक व दोन वाहक देण्याची देण्याचा नियमावली आहे असे असतानाही एक चालक आणि एक वाहक देऊन प्रांजल धुरी यांनी हेतू पुरस्कार अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या वागण्यास सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित व बस स्थानक प्रमुख राजाराम राऊळ यांनीही साथ दिलेली आहे.
राज्य एसटी महामंडळाचे प्रवासी वाढावे एसटीचे आर्थिक उत्पन्न वाढावे या दृष्टीने शासन स्तरावरून विविध योजनांच्या माध्यमातून व महामंडळ स्तरावरून प्रयत्न होत असताना राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचा पदाधिकारी शिवराम मुळीक हा कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आवाज उठवतो हा राग मनात धरून ही हेतू पुरस्कार जबरदस्तीने केलेली कार्यवाही असून याबाबत विभाग नियंत्रकाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून येत्या सात दिवसात संबंधितावर कारवाई करावी अन्यथा त्यानंतर राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष सुनील डुबळे यांनी व्यक्त केला आहे.या घडलेल्या प्रकाराबाबत सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचे सुनील डुबळे यांनी भेट घेऊन माहिती दिली .असे प्रकार राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यावर होत आहेत.एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांस त्रास दिला जात आहे.त्यामुळे हेतू पुरस्कर जबरदस्तीने ड्युटी लागणाऱ्या संबंधितांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली असता याबाबत सिंधुदुर्गच्या विभाग नियंत्रकांशी बोलून चौकशी लावतो असे आश्वासन देण्यात आलेले आहे.