जि.प.पु.प्रा.शाळा शिरवंडे पिंपळवाडी नं. ३ शाळेचा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान

जि.प.पु.प्रा.शाळा शिरवंडे पिंपळवाडी नं. ३ शाळेचा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान

*कोंकण एक्सप्रेस*

*जि.प.पु.प्रा.शाळा शिरवंडे पिंपळवाडी नं. ३ शाळेचा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान*

*मालवण : प्रतिनिधी*

ओरोस येथे संपन्न झालेल्या शिक्षक भारती त्रिवार्षिक अधिवेशना मध्ये मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवंडे पिंपळवाडी या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन भाजप जिल्हाध्यक्ष मा.प्रभाकर सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी युवा नेते ग्रामपंचायत सदस्य,तालुका कार्यकारिणी सदस्य मालवण रघु गांवकर,शालेय समिति अध्यक्ष लक्ष्मण घाडिगावकर,संदेश गावकर,प्रशालेचे शिक्षक आणि पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!