*कोंकण एक्सप्रेस *
*हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त युवासेनेतर्फे जिल्हास्तरीय भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेनेतर्फे जिल्हास्तरीय भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तालुक्यातील विठ्ठल मंदिर, कलमठ येथे ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी ▪️बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व,▪️बाळासाहेब ठाकरे यांचा भाषणातील एक क्षण आणि ▪️बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी बाणा हे विषय ठेवण्यात आले आहेत.
स्पर्धेसाठी नियम आणि अटी पुढीलप्रमाणे – १. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश फि नाही,२. प्रथम नाव नोंदणी करर्णाया १२ स्पर्धकांना संधी देण्यात येईल.,३. एका रांगोळीसोबत केवळ एक स्पर्धक ग्राह्य धरला जाईल.,४. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.,५. ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित राहील.,६. स्पर्धेचे साहित्य स्पर्धकांनी स्वतः घेऊन यावे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धीरज श्रीधर मेस्त्री ८८०५८३१२८१ यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक – ५००१ व चषक,द्वितीय पारितोषिक ३००१ व चषक,तृतीय पारितोषिक – १५०१ व चषक आणि उत्तेजनार्थ पारितोषिक – ५०१ व चषकअसे ठेवण्यात आले असून जास्तीत जास्त रांगोळी कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन युवासेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कलमठ यांच्या तर्फे करण्यात आले आहे.