*कोंकण एक्सप्रेस*
*हळबे महाविद्यालयाचे पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन साजरे*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
काळानुसार आपल्या समोरचे आव्हानं बदलत आहेत. त्यात टिकायचे असेल.जीवघेण्या स्पर्धेचा सामना करायचा असेल तर मनाने आणि बुद्धीने सक्षम बना.नवे तंत्र शिका असे प्रतिपादन पर्वरी गोवा येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रमेश तिवारी यांनी केले. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, ध्येय निश्चित करा. ते प्राप्तीसाठी कठीण परिश्रम करा.स्वतःमधील क्षमतेचा पुरेपूर वापर करा.स्वतःवर विश्वास ठेवा.स्वतःला सक्षम बनवा.कॉलेज जीवन हे आनंदही असते.त्याचा आनंद घ्या.पण स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष करू नका.असेही ते म्हणाले.
यावेळी मोपा एअरपोर्ट गोवा,येथील स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख सचिन केतकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,कौशल्यावर आधारित शिक्षण घ्या. स्वतःला डेव्हलप करा.इंग्रजी भाशेचे शिक्षण घ्या.आपले राहणीमान अपडेट ठेवा.काळानुरूप पोशाख, व संभाषनं कौश्यल्य वीकशीत करा.