*कोंकण एक्सप्रेस*
*स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त23 जानेवारीला विविध कार्यक्रम…*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दोडामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे..23 जानेवारी सकाळ पासून संध्याकाळी पर्यंत कार्यक्रम होणार आहे. आज दोडामार्ग येथील संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.. यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकार यांचा सन्मान करणे. महिलांचा हळदी कुकू, कार्यक्रम, प्राथमिक शाळेत लहान मुलांना खाऊ वाटप .. मिलिंद नाईक मित्रमंडळ यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी तालुका प्रमुख संजय गवस, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, उप तालुका प्रमुख मिलिंद नाईक,उप तालुका संघटक संदेश वरक,युवा सेना प्रदिप सावंत,विभाग प्रमुख दशरथ मोरजकर, माजी, उपसभापती बाळा नाईक,सिधदु कासार सोमनाथ गवस, प्रमोद ठुबंरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते..