*कोंकण एक्सप्रेस*
*पिकुळे शेळपीवाडी येथील धालोत्सवाचा आज पाचवा दिवस ; सालाबादप्रमाणे उत्साहात आयोजन..*
*दोडामार्ग : शुभम गवस*
श्री महालक्ष्मी देवी महिला मंडळ पिकुळे, शेळपीवाडी या मंडळाचा धालोत्सवाचा आज पाचवा दिवस. धालोत्सव म्हणजे ५ दिवस चालणारा वन देवीचा जागर होय. या दिवशी नवस फेडणे , नवस बोलणे, रात्रभर जागून देवीचा जागर केला जातो.
या धालोत्सवाचा निमित्त
वनदेवीची पुजा तसेच देवीचा महाप्रसाद रात्री 8:00,
पावणीचा कार्यक्रम रात्री 10.00,
महिलांचे कार्यक्रम ठीक रात्री 12.00 वाजता होणार आहे.
ज्ञानेश्वर नाईक, विलास नाईक, दिलीप नाईक, सुंदर नाईक , श्याम नाईक , आनंद नाईक, म्हाळु नाईक, विराज नाईक, ओम नाईक, सोहम नाईक, रोहित नाईक, महेश नाईक.
यांनी सर्व भाविकांनी धालो उत्सवाला उपस्थित राहून धालो उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलेले आहे.