*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग उबाठा शिवसेनेला खिंडार..*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
दोडामार्ग उबाठा शिवसेना गटाचे संदेश राणे, सोशल मीडिया तालुका प्रमुख, लक्ष्मण आयनोडकर, तालुका संघटक,भिवा गवस, विभाग संचटक, शुभंकर देसाई, उपविभाग प्रमुख युवा गणेश धुरी उपविभाग प्रमुख, संदेश गवस, युवा सेना उप तालुका प्रमुख माटणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज जिल्हा प्रमुखांकडे राजीनामे दिले आहेत.
पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी हे राजिनामे दिले असल्याचे त्यांनी सांगितले,शिवसेना उबाठा राजीनामे देणाऱ्या पत्रात लक्ष्मण आयनोडकर, तालुका संघटक, संदेश राणे, सोशल मीडिया प्रमुख भिवा गवस, विभाग संचटक, शुभंकर देसाई, उपविभाग प्रमुख युवा गणेश धुरी उपविभाग प्रमुख, संदेश गवस, युवा सेना उप तालुका प्रमुख माटणे यांचा समावेश आहे.