*कोंकण एक्सप्रेस*
*नामदार नितेश राणे सिंधुदुर्गचे नवे पालकमंत्री*
*कणकवली :प्रतिनिधी*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा मत्सोद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश नीलम नारायणराव राणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.तब्बल 2014 नंतर पुन्हा एकदा राणे कुटुंबियांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे आली आहे.
नामदार नितेश राणे यांचे वडील खा.नारायण राणे यांनी सन २०१४ मध्ये सिंधुदुर्गाच्या पालकमंत्री पदाची धुरा समर्थपणे होती.त्सांयानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पालकमंत्री पदाच्या माध्यमातून नामदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाला वेगळ्या उंचीवर नेतील यात शंकाच नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर जाण्याआधी नुकतीच पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.आणि बऱ्याच जणांनी तर नितेश राणे हेच पालकमंत्री होणार असा दावा केला होता.त्यप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नामदार नितेश राणे यांचे नाव आज घोषित करण्यात आले.