*कोकण Express*
*कणकवली नगरवाचनालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा…!*
*कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस; मराठी पुस्तक प्रदर्शन….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मराठी भाषेच्या उद्धारासाठी प्रत्येकांने मराठी भाषा वापरावी त्यातून मराठी भाषेचे महत्व वाढेल. मुळात आपल्या संस्कारांची भाषा ही मराठी आहे.याचा सार्थ अभिमान आपल्याला असला पाहिजे. मराठी भाषेतील विविध लेखकांची पुस्तके वाचल्यास मराठी भाषेची गोडी तसेच आवड निर्माण होईल असे प्रतिपादन हनीफ पिरखान यांनी केले.
मराठी भाषेचे विख्यात साहित्यिक व कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रु.हां जन्म दिवस शासनाने मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने शनिवारी कणकवली नगरवाचनालयात कथा, कादंबरी तसेच विविध मराठी पुस्तक प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. या कर्यक्रमाचे दीपप्रज्वलन कार्यवाह हनीफ पिरखान यांच्या हस्ते करण्यात आले. तदपूर्वी समिधा गावकर,भाग्या फणसकर, श्रद्धा पाटील मानसी खानोलकर या विदयार्थीनीनी सुरेश भट यांनी लिहिलेले मराठी गीत सादर करत मराठी भाषा दिनाचे महत्व विशद केले.
यावेळी वाचनालयाचे सदस्य डी.पी.तानवडे, विद्यामंदिर हायस्कुलच्या मराठी विभागाच्या शिक्षिका स्नेहा सावंत, वाचनालयाचे ग्रंथपाल राजन ठाकूर,लिपिक स्नेहा चव्हाण,विदयार्थी,वाचक आदी उपस्थित होते.