*कोंकण एक्सप्रेस*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत कलाक्षेत्रातील करिअर व संधी मार्गदर्शन
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत चित्रकला विभाग सुसज्ज आहे कलेच्या क्षेत्रात पारंगत असलेले कला शिक्षक श्री प्रसाद राणे सर स्वतः कलेवेवर जिवापाड प्रेम असल्यामुळे कलेच्या प्रातांत निष्णान्त असलेले मार्गदर्शक प्रशालेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले तर या क्षेत्राची अभिरूची वाढेल या उद्देशाने बी एस बांदेकर आर्ट कॉलेज सावंतवाडी चे तज्ञ मार्गदर्शक प्रा.तुकाराम मोरजकर सर यांनी कला क्षेत्रातील विविध विभाग आणि शिक्षण,शिक्षणाचा कालावधी या विषयी स्लाईड प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले.तर कलेचे शिक्षण घेण्याकरिता आर्ट कॉलेजला द्यावी लागणारी सीईटी परीक्षा त्याचे ऑन लाईन फॉर्म भरणे अभ्यासक्रम, पेपरचे स्वरूप या विषयी प्राध्यापक चेतन जगताप सर यांनी मार्गदर्शन केले.
जीवनाच्या प्रत्येक अंगात कला विषय किती महत्वाचा असतो या विषयी करिअरच्या वळणवाटा बांदेकर आर्ट कॉलेजच्या तज्ञ मार्गदर्शकांनी प्रशाळेतील विद्यार्थ्यांना उलगडून दाखविल्या यावेळी मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी कला आणि मानवी जीवन यांचा सहसंबंध उलगडून मार्गदर्शन केले.यावेळी पर्यवेक्षक सौ वृषाली जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक श्री अच्युतराव वणवे सर आर्ट कॉलेजचे प्राचार्य श्री उदय वेले सर उपस्थित होते
या उपक्रमांचे आयोजन कला शिक्षक श्री प्रसाद राणे सरांनी केले . यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.