परमे -घोटगे मार्गावरून अवैध रित्या सुरु असलेली खडी वाहतूक तात्काळ बंद करन्याची मागणी

परमे -घोटगे मार्गावरून अवैध रित्या सुरु असलेली खडी वाहतूक तात्काळ बंद करन्याची मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*परमे -घोटगे मार्गावरून अवैध रित्या सुरु असलेली खडी वाहतूक तात्काळ बंद करन्याची मागणी*

*जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे सुधीर दळवी यांनी केले निवेदन सादर*

*दोडामार्ग : प्रतिनिधी*

परमे येथे एका परप्रांतीय धनाड्य व्यक्तीचा दगडी खाण व क्रशर सुरु आहे, सदर कंपनीला कोणत्या साली दगड काढण्यास परवानगी मिळाली तसेच ती कीती सालापर्यंत आहे, त्याचे पुन्हा नूतनिकरण केले आहे का? आदी प्रश्न अनुत्तरित आहे. तसेच ही खडी वाहतूक परमे -घोटगे मार्गावरून अवैध रित्या सुरु असून ती बंद करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी केली आहे.

ही वाहतूक कालव्या वाटे सुरु असून यामुळे कालव्याला धोका निर्माण झाला आहे,या अवैध वाहतुकीमुळे अनेक लहान मोठे अपघात होतं आहेत.यामुळे ही वाहतूक त्वरित रोखावी तसेच या दगड खाणीची चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे सुधीर दळवी यांनी जिल्हाधिकारी यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!