*कोंकण एक्सप्रेस*
*प्रतिक राणे यांना विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते युवा पत्रकार पुरस्कार प्रदान ;सर्व स्तरातून होतेय अभिनंदन*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने युवा पत्रकार पुरस्कार साटेली-भेडशी गावचे सुपुत्र प्रतिक राणे यांना विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर व माजी शिक्षणमंत्री आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष सिताराम गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब विद्यमान अध्यक्ष अनंत जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.प्रतिक राणे यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.