*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग सोसायटीतर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग सोसायटी ली.कणकवली यांच्या वतीने जानेवारी २०२५ मध्ये नवउद्योजक घडविण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा शालेय व खुला अशा दोन गटात होणार आहे स्पर्धकांनी आपले निबंध ३१ जानेवारीपर्यंत संस्थेच्या कणकवली येथील कार्यालयापर्यंत पोस्ट अथवा कुरियर ने पाठविणे आवश्यक आहे.
उद्योजकता ही देशाची संपत्ती आहे प्रत्येक तरुण-तरुणींमध्ये उद्योजक प्रवृत्ती दडलेली असते या प्रवृत्तीस प्रेरणा दिली तर तरुणांमध्ये चांगला उद्योजक जन्माला येतो.जो पुढे जाऊन देशाच्या संपत्तीत भर घालू शकतो.सुशिक्षित बेरोजगारांना स्वयं रोजगारासाठी प्रवृत्त करणे तसेच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास घडविण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्याकडील शक्तीची जाणीव करून त्यांच्या उद्देशाने जानेवारी २०२५ मध्ये जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धा २०२५ आयोजित केले आहे.ही स्पर्धा कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग सोसायटी यांच्यामार्फत पुरस्कृत करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी उद्योजकतेतून राष्ट्र विकास व उद्योजकता विकासाची गुरु कील्ली असे दोन विषय ठेवण्यात आले आहे स्पर्धेसाठी इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत शालेय गट असून त्यासाठी शब्द मर्यादा ३५० ते ४०० शब्दांची ठेवली आहे तर खुल्या गटासाठी ५०० ते ७५० शब्दांची मर्यादा निबंधासाठी ठेवली आहे शालेय गटासाठी प्रथम बक्षीस ५५१ .रू द्वितीय ३५१ रु तृतीय २५१ रू उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. खुल्या गटातील प्रथम विजेत्यास १०५१ रू.द्वितीय ५५१ रू, तृतीय ३५१ रू. व उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना सन्मान चित्र व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. निबंध फुलस्केप पानाच्या एका बाजूला लिहिलेला असावा .त्यावर आपले पूर्ण नाव, पत्ता ,जन्मतारीख, इयत्ता, शाळेचे नाव, मोबाईल क्रमांक आदी माहिती द्यायची आहे. तरी स्पर्धकांनी आपले निबंध अध्यक्ष / सचिव, कणकवली तालुका ग्रामोद्योग सोसायटी ,कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघासमोर नगरपंचायत रोड येथे पाठवायचे आहेत .अधिक माझ्यासाठी सचिव दीपक जाधव मोबा.९४०५ २५७ ३७२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग सोसायटी चे चेअरमन सुरेश सुतार व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.