*कोंकण एक्सप्रेस*
*संस्कृती जपणाऱ्या धार्मिक उत्सवांसोबत सभ्यता व सौम्यता कोकणभूमीत !*
*कोकणचा सुपुत्र असल्याचा अभिमान – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर*
*मालवण : प्रतिनिधी *
देवातांच्या उत्सवांची संस्कृती कोकणात रुजली आहे.येथील पिढ्या ही संस्कृती पुढे नेत आहेत. मातोंड, पेंडूर व अन्य गावात साजरे होणारे देवीचे उत्सव त्याच परंपरेने अतिशय उत्साहात साजरे होतात.धार्मिक उत्सवांसोबत सभ्यता व सौम्यता कोकण भूमीत आहे.माझीही नाळ तळकोकणशी जुळली असून कोकणचा सुपुत्र असल्याचा अभिमान आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मालवण पेंडूर येथे बोलताना केले.
कोकणचा विकास हे माझे कर्तव्य नव्हे तर धर्म आहे. कोकणात विकास आणि रोजगार निर्माण व्हावे यावर प्राधान्य राहील.मुंबईत गेलेला कोकणी माणुसही पुन्हा कोकणात माघारी येईल अश्या रोजगाराच्या संधी याठिकाणी उपलब्ध होतील.असा विश्वासाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यां निमित्ताने व्यक्त केला.