*कोंकण एक्सप्रेस*
*जाचक अटीच्या विरोधात सावंतवाडीतील देवस्थानाच्या मानकऱ्यांचा २६ जानेवारीला सावंतवाडी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा*
*बांदा : प्रतिनिधी*
देवस्थान समितीच्या माध्यमातून गाव स्तरावर काम करणाऱ्या उपसमित्यांना घालून देण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात, या मागणीसाठी तालुक्यातील देवस्थान समितीच्या मानकऱ्यांनी २६ जानेवारीला सावंतवाडी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सावंतवाडी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. जाचक अटी घालून देण्यात आल्यामुळे देवस्थानाचा कारभार हाकताना अनेक अडचणी येत आहेत.याबाबत वारंवार लक्ष वेधूनही काहीच सकारात्मक भूमिका घेतली जात नाही.त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे,असा सक्त इशारा मानकऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे
सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीची बैठक काल सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी राजवाड्यात झाली. सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती अध्यक्ष एल. एम. सावंत, (कोलगाव), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब (आंबेगाव), सचिव राजाराम सावंत (बांदा), खजिनदार विलास गवस (वाफोली), सदस्य कृष्णा उर्फ जीजी राऊळ (माडखोल), पंढरीनाथ पु राऊळ (सांगेली), चंदन धुरी (कोलगाव), सुभाष गावडे (चौकुळ), मधुकर देसाई (डेगवे,) विलास सावंत (डिंगणे), लक्ष्मण परब (चराठा), वसंत धुरी (सातोसे) आदी उपस्थित होते.