हरकुळ येथे कार अपघातात नऊ जखमी

हरकुळ येथे कार अपघातात नऊ जखमी

*कोकण Express*

*हरकुळ येथे कार अपघातात नऊ जखमी*

*जखमी झालेल्यांपैकी बहुतांश भिरवंडे येथील*

*कणकवली ः प्रतिनिधी*

हरकुळ बुद्रुक येथून कणकवलीच्या दिशेने कारने येत असताना समोरून येत असलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्ग सोडून बाहेर येत कलंडली. अपघातात कारमधील नऊजण जखमी झाले. हा अपघात कणकवली – कनेडी राज्यमार्गावरील हरकुळ बुद्रुक येथील काणेकर दुकानानजीक शनिवारी सकाळी ११.३० वा. सुमारास घडला. जखमींना उपचारासाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात काहींना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना अन्यत्र हलविण्यातबाबत हालचाली सुरू होत्या. जखमी झालेल्यांपैकी बहुतांश भिरवंडे येथील असून काहीजण पाहुणे आहेत. हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ते भिरवंडे येथे दाखल झाले होते. अपघातात कारचेही नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिप अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, पं. स. सदस्य मंगेश सावंत, भिरवंडेचे उपसरपंच नितीन सावंत आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!