*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ न.प.च्या नगराध्यक्ष पदासाठी २४ जानेवारीला निवडणूक*
*२० जानेवारी पर्यंत नामनिर्देश दाखल करायची मुदत*
*२४ जानेवारीला विशेष सभेचे आयोजन*
*कुडाळ : प्रतिनिधी*
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक 24 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025 रोजी नगराध्यक्षपदाची निवड होणार आहे. यासाठी 24 रोजी सकाळी 11 वा विशेष सभेच आयोजन करण्यात आले आहे
नगराध्यक्षा सौ अक्षता खटावकर यांनी नुकताच नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर नगराध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यामुळे या नगराध्यक्षपदाचा निवड कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्याऱ्यांनी जाहिर केला आहे. सोमवार दि. 20 जानेवारी रोजी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लठविणाऱ्या उमेदवाराने मुख्याधिकारी यांच्याकडे दुपारी 2 वाजे पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत संपल्यानंतर पिठासीन प्राधिकारी यांच्यामार्फत नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे, नामनिर्देशन पत्राची छाननी झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत पिठासीन प्राधिकारी यांच्यामार्फत नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांची नावे व ती फेटाळण्याची कारणे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
बुधवार दि. 22 जानेवारी रोजी सायं. 5 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांनी अपिल दाखल करणेस मूदत, नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांनी अपील दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशन केलेल्या उमेदवारांची नावे जाहिर करणे, गुरुवार दि. 23 जानेवारी रोजी वैधरित्या नामनिर्देशन केलेल्या उमेदवारांची नावे जाहिर केल्यानंतर सायंकाळी 4 वाजेपर्यंत उमेदवाराने सही केलेली लेखी नोटीस स्वतः मुख्याधिकाऱ्याकडे देवून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे. शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेच्या सुरुवातीला निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे घोषित करणे, त्यानंतर बाब क्र. 7 प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी मतदान व पिठासीन प्राधिकाऱ्यांमार्फत निकाल घोषित करणे, असा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केला आहे.