सावंतवाडी शिरोडा मार्गावरील घाटीत खोल दरीत कोसळून गाडीला अपघात

सावंतवाडी शिरोडा मार्गावरील घाटीत खोल दरीत कोसळून गाडीला अपघात

*कोकण Express*

*सावंतवाडी शिरोडा मार्गावरील घाटीत खोल दरीत कोसळून गाडीला अपघात*

 *सावंतवाडी  ः प्रतिनिधी*

सावंतवाडी शिरोडा मार्गावरील घाटीत रस्त्यालगतच्या सुरक्षा गार्ड तोडून एक मारुती इको कार १०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. सावंतवाडी शहरातील गौरव चंद्रशेखर नाईक व त्यांचे कुटुंबिय सावंतवाडी शहरात परतत असताना घाटात अचानक गवारेडा आडवा आल्याने गाडी बाजूला घेतली. त्यामुळे रस्ता सोडून ही गाडी घाटात ​​कोसळली. मात्र सुदैवाने गाडीतील सर्व प्रवासी बालबाल बचावले. चारच्या सुमारास हा अपघात घडला. याबाबतची माहिती पोलीस कॉन्स्टेबल राजेश गवस यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!