सावंतवाडीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा दिनांक १९ जानेवारीला

सावंतवाडीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा दिनांक १९ जानेवारीला

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा दिनांक १९ जानेवारीला*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्विसमेन असोसिएशन संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोली आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आंबोली या सैनिक शाळेच्या स्थापनेस २१ वर्षे पूर्ण झाली. २१ व्या वर्धापनदिनानिमित्त ही भव्य स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धावपटूंसाठी आयोजित करण्यात आली आहे. दिनांक १९/०१/२०२५ रोजी सकाळी ०६ .०० वाजता जनरल जगन्नाथ राव भोसले उद्यान सावंतवाडी येथे मॅरेथॉन स्पर्धेस प्रारंभ होणार आहे.

मॅरेथॉन स्पर्धा खुला गट( पुरुष/महिला),१० वर्षाखालील (मुले/मुली)१४ वर्षाखालील (मुले/मुली)१७ वर्षाखालील (मुले/मुली) अशा गटांत होणार आहे.वरील गटांतील विजेत्या मुले व मुली धावपटूंना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्या धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र तसेच अल्पोपहार देण्यात येणार आहे.नोंदणी साठी ९४२०१९५५१८,७८२२९४२०८१ या क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा https://forms.gle/5dPGnY1L5LewwduS7 या लिंक द्वारे नोंदणी करावी. सदर स्पर्धेतील नोंदणी विनामूल्य आहे. स्पर्धेसाठी येताना आधार कार्ड घेऊन यावे.धावपटूंनी बहुसंख्येने मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कार्यकारी अध्यक्ष श्री.सुनील राऊळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!