*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडी पेट्रोलपंपानजीक आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
वैभववाडी येथील पेट्रोल पंपानजीक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.सदर व्यक्तीचा अपघात की घातपात,याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.याबाबत पेट्रोल पंप मालक स्नेहल संतोष रावराणे रा. माईणकवाडी वैभववाडी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल व पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.मृतदेहाच्या अंगावरून टायर गेल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत आहे.मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० इतके असावे.त्या व्यक्तीच्या अंगावर निळसर रंगाचा टी-शर्ट आहे.सदर टी-शर्ट च्या पाठीमागील बाजूस इसबादेवी असं नाव आह.तर निळी पॅन्ट व बूट त्याने परिधान केले होते.अज्ञात वाहनाच्या टायरखाली चिरडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.सदर व्यक्तीचा मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल करत आहे.