*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग तिराळी येथे खडी वाहतूक डंपरने युवकाला चिरडले*
*उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
दोडामार्ग तिराळी राज्य मार्गावर आज पुन्हा एक भीषण अपघात झाला यामध्ये खडी वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकी स्वराला धडक दिल्यामुळे मागच्या शाखा खाली येऊन गंभीर जखमी झाला होता त्याला पुढील उपचारासाठी गोवा येथे दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समजते. .
याबाबत सविस्तर वृत्त असे की दोडामार्ग तिराळी राज्यमार्गावर आज दुपारी साटेली भेडशी उसप तिठ्या नजिक खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची धडक प्रसाद तुकाराम कांबळे या दुचाकी स्वाराला बसली.ही धडक एवढी भीषण होती की या अपघातात तो या डंपरच्या मागच्या चाकाखाली आला आणि अंगावरून डंपरचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला.यावेळी त्या ठिकाणी वाहतूक पोलिसही घटनास्थळी उभे असल्याचे येथील बघ्यानी सांगितले. मात्र त्यांनी या अपघाताचा कोणताही पंचनामा न करताच येथील वाहने बाजूला केल्याने लोकांनी याचा तीव्र संताप व्यक्त केला.