कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत विद्यार्थ्याना रस्ता सुरक्षा मार्गदर्शन

कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत विद्यार्थ्याना रस्ता सुरक्षा मार्गदर्शन

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत विद्यार्थ्याना रस्ता सुरक्षा मार्गदर्शन*

*कणकवली : प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत उपनिभागिय परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग ( आर टी ओ ) यांच्या वतीने रस्ता सुरक्षा मार्गदर्शन मा श्री ढोबळे साहेब व त्यांचे सहकारी यांनी केले.सध्याच्या धावपळीच्या युगात पालक अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यास देत असतात.कायद्यानुसार कमी वयात गाडी चालविण्यासाठी देता येत नाही.अल्प वयातील मुले कोणताही विचार न करता केवळ हौस म्हणून भरधाव वेगाने गाडी चालवून अपघाताला कारण ठरतात.तसेच रस्त्याचे नियम पाळत नाही.

गाडी चालवताना मोबाईलवर बोलत गाडी भरधाव वेगात चालवून फार मोठे अपघात होत आहेत.तसेच हेलमेंटचा वापर सर्वांनी करावा पालक वर्गांने मुलांच्या बाबतीत जागृत रहावे त्यांना कायद्याचे ज्ञान करून द्यावे.अपघातापासून अल्पवयीन मुलांना वाचवावे असे सुंदर मार्गदर्शन आदरणीय ढोबळे साहेब यांनी केले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर पर्यवेक्षक सौ वृषाली जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक श्री अच्युतराव वणवे सर श्री शेळके जे जे सर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!