महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे १९ जानेवारीला जिल्हा अधिवेशन

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे १९ जानेवारीला जिल्हा अधिवेशन

*कोंकण एक्सप्रेस*

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे १९ जानेवारीला जिल्हा अधिवेशन*

*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग शाखेचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन रविवारी दि. १९ जानेवारी रोजी  मंगल कार्यालय सिंधुदुर्ग नगरी येथे सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून संघटनेचे राज्य संघटक किसन दुखंडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.

यावेळी विशेष अतिथी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार कपिल पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, शिक्षणाधिकारी गणपती कमळकर, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दया नाईक, राज्य संघटक किसन दुखंडे, शिक्षक नेते संजय वेतुरेकर, माध्यमिक शिक्षक भारती अध्यक्ष प्रशांत आडेलकर, भाजप अध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा उदयोजक भाई सावंत, संतोष वालावलकर तर संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अधिवेशनात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा व आदर्श शाळाचा सत्कार होणार असून विविध शैक्षणिक ठराव मांडले जाणार आहेत. तर नवी जिल्हा कार्यकारणीची निवड केली जाणार आहे. तरीही या अधिवेशनाला सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!