*कोंकण एक्सप्रेस*
*कसाल येथे १७ जानेवारीला पोलीस ग्रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजन*
*कसाल : प्रतिनिधी*
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात पोलीस ग्रामसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे,या अनुषंगाने कसाल ग्रामपंचायत सभागृहात हा उपक्रम १७ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
यावेळी सायबर गुन्ह्यांबाबत तसेच डायल ११२ याबाबत उपस्थितांना माहिती दिली जाणार आहे.ग्रामस्थांच्या विविध समस्या यावेळी जाणून घेतल्या जाणार आहेत. गावात येणारे फेरीवाले तसेच ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. पोलीस ग्रामसंवाद कार्यक्रमाला उपस्थित रहावे,असे आवाहन कसाल ग्रामपंचायत सरपंच राजन परब यांच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.