*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राज्य क्रीडा दिन व क्रीडा महोत्सव बक्षिस समारंभ संपन्न*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राज्य क्रीडा दिन खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरा करण्यात आला.प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव घेण्यात आला होता त्यातील प्रत्येक क्रीडा प्रकारात यशस्वी खेळाडूंचे प्रमाणपत्र व शिल्ड देवून गौरव करण्यात आले.या समारंभाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री .तवटे साहेब सचिव श्री . वळंजू साहेब विश्वस्त श्री डेगवेकर साहेब उपस्थित होते.
प्रास्ताविक जेष्ठ क्रीडा शिक्षक अच्युतराव वणवे सरांनी केले क्रीडा दिनाचे महत्व आणि खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील स्थान या विषयी मार्गदर्शन करून शालेय क्रीडा स्पर्धेत कोणकोणत्या स्पर्धा घेतल्या त्या विषयी माहिती सांगून विजेत्या स्पर्धेकांचे कौतुक केले.सूत्रसंचालन श्री सिंगनाथ सरांनी केले.यावेळी उद्योजक आबिद नाईक साहेब व . सौ दिपा पेडणेकर मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री वळंजू साहेब यांनी सर्व खेळाडू यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले तसेच नाथ पै एकांकीका स्पर्धेत प्रशालेतील बालकलाकारांनी सादर केलेल्या शिमगो बाल नाट्याचा प्रथम क्रमांक प्राप्त झाल्या बद्दल लेखक श्री मनोज मेस्री दिग्दर्शक श्री काणेकर साहेब व सर्व बाल कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच दिविजा वृद्धाश्रमाने चित्रकला स्पर्धा घेतल्या होत्या.त्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव करण्यात आला.जिल्हा विज्ञान स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री तवटे साहेब यांनी सर्वांचे कौतुक करून मार्गदर्शन केले .श्री अबिद नाईक साहेब यांनीही सर्व विद्यार्थांचे कोतुक करून शुभेच्छा दिल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी सर्वांचे कौतुक केले.यावेळी पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव व प्रशालेतील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

